वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी वाराणसीमध्ये युक्रेनमधून (Ukraine) परतलेल्या विद्यार्थ्यांची (Indian Student) भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव पंतप्रधानांना सांगितले. वाराणसी आणि उत्तर प्रदेशातल्या विद्यार्थ्यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी विदयार्थ्यांना दिला धीर
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीर दिला.  सरकार प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्यावर काम करत आहे, 70 वर्षांच्या तुलनेत 10 वर्षांत अधिक डॉक्टर होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय शिक्षणाची धोरणं पूर्वी चांगली असती तर कदाचित तुम्हाला परदेशात जावे लागले नसतं, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितलं.


'ऑपरेशन गंगा' अंतर्गत विद्यार्थी परतले
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या सुमारे 20 हजार भारतीयांना पीएम मोदींनी ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत तेथून बाहेर काढले आहे. भारत सरकार तिथल्या विद्यार्थी आणि तिथे अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्यामुळेच युक्रेनच्या शेजारील देशांशी बोलून सर्व भारतीयांना यशस्वीपणे परत आणण्याचे काम वेगाने सुरू आहे.


असं सुरु आहे 'ऑपरेशन गंगा'चं काम
भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी बचाव कार्याला वेग दिला आहे. अधिकाधिक भारतीयांना आणण्यासाठी फ्लाइट्सच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. 10 मार्चपर्यंत, अडकलेल्या सर्व भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्सची मदत घेतली जात आहे.