नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील अन्य उच्चपदस्थांच्या सुरक्षित हवाई प्रवासासाठी दोन विशेष विमाने तयार करण्यात येत आहेत. बोईंग कंपनीच्या बी ७७७ जातीची ही विमाने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. २०२० पर्यंत ही विमाने भारताच्या ताब्यात मिळतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपरराष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांच्याकडून परदेशात जाण्यासाठी बी ७४७ जातीच्या 'एअर इंडिया वन' विमानांचा वापर केला जातो. या विमानांचे सारथ्य एअर इंडियाच्या वैमानिकांकडूनच केले जाते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यात प्रथमच महिला कमांडो


मात्र, नव्या विमानांची कमान ही वायूदलात खास प्रशिक्षण देण्यात आलेल्या वैमानिकांकडे देण्यात येणार आहे. ही विमाने केवळ उच्चपदस्थांसाठीच वापरण्यात येतील. अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून या विमानांची बांधणी सुरु आहे. यामध्ये क्षेपणास्त्रपासून संरक्षण करणारी, क्षेपणास्त्राचा मार्ग बदलण्याची क्षमता असलेल्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमचा समावेश असेल. भारताने फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेकडून हे तंत्रज्ञान विकत घेतले होते. यासाठी १९० कोटी डॉलर्स मोजण्यात आले होते. याशिवाय, अन्य सुविधांनीही हे विमान सुसज्ज असेल. 


'एसपीजी'बाबत सरकारचे नवे नियम, परदेशातही सुरक्षा न्यावी लागणार