नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पटना येथील गांधी मैदानात झालेल्या सभेत कॉंग्रेस सहीत विरोधी पक्षांवर टीका केली. पाकिस्तान अधिकृत काश्मीर (पीओके) मध्ये भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकवर त्यांनी यावेळी भाष्य केले. एअर स्ट्राईकवर प्रश्न विचारून विरोधक आपल्या जवानांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ज्याप्रकारे सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते त्याप्रमाणे हे आता एअर स्ट्राईकचा पुरावा मागत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) भारतीय वायुसेनेच्या पीओकेमधील एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करुन विरोधक आणि कॉंग्रेस सैन्याचे मनोबल कमी करत आहेत का ? विरोधक अशी वक्तव्य का करत आहे ज्यामुळे देशाच्या शत्रुंना फायदा होईल? असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. 



2) हा नवा हिंदुस्तान असून नव्या रणनीतीने पुढे जात आहे. हा भारत आपल्या वीर जवानांच्या बलिदानावर गप्प बसणार नाही. एक एक करुन सर्वांचा बदला घेणार


3) सुरक्षा गरीबांची असो किंवा देशाची..देशावर वाईट नजर ठेवणाऱ्यांसमोर हा तुमचा हा चौकीदार आणि आमचे NDA भिंत म्हणून उभे राहील. 


4)गरीब आणि मध्यम वर्गाच्या मेहनतीवर जी दुकाने सुरू होती तेच चौकीदारापासून त्रस्त आहेत. यासाठी मला शिव्या देण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. पण तुम्ही निश्चिंत राहा तुमचा चौकीदार दक्ष आहे. 


5)सीमेच्या आत असो किंवा बाहेर आपला देश दहशतवादाला मिटवण्यासाठी एकजूट झाला आहे. अशावेळी देशाच्या आतील लोक काय करत आहेत ? देशाच्या सैन्याचे मनोबल वाढवण्या ऐवजी अशी कामे करत आहेत द्यामुळे शत्रुंच्या चेहऱ्यावर समाधान आहे. 


6) चाऱ्याच्या नावाखाली काय काय झालंय हे बिहारच्या जनतेला माहिती आहे. आमचे सरकार दशकापासून सुरू असलेला भ्रष्टाचार संपविण्यासाठी काम करत आहे. 



7) जेव्हा दहशतवाद विरोधात एक सुरात बोलण्याची वेळ होती तेव्हा दिल्लीमध्ये 21 पक्ष मिळून मोदीच्या विरोधात, केंद्राच्या NDA विरोधात निंदा प्रस्ताव पारित करण्यात एकत्र आले होते. 


8) इतिहासातील सर्वात मोठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना प्रत्यक्षात आली आहे. या योजनेचा लाभ बिहारच्या 1.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना तसेच देशाच्या साधारण 12 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.