नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स सार्वजनिक केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमा दरम्यान सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून याबद्दलची मागणी होत होती पण विद्यमान सरकारने हे करुन दाखवल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.  सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरुन हा कार्यक्रम प्रसारीत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा हा ५२वा भाग असून या वर्षातली पहिली 'मन की बात' आहे. असणार आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान पद्म पुरस्कार, अर्थ संकल्प, तसे परिक्षा चर्चा याविषयांवर चे संवाद साधत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आठवणींना उजाळा दिला. 23 जानेवारीला नेताजींची जयंती संपूर्ण देशाने वेगळ्या अंदाजात साजरी केली. लाल किल्ल्यावर नेताजींच्या परिवारातील सदस्यांनी मला एक खास टोपी भेट दिली. कधीकाळी नेताजी ती टोपी घालत असत. मी संग्रालयात ती टोपी ठेवली. ज्यामुळे तिथे येणारे देशवासिय ती टोपी पाहतील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतील. 30 डिसेंबरला अंदमान आणि निकोबार बेटांवर गेलो होतो. एका कार्यक्रमा दरम्यान तिथे तिरंगा फडकावला जिथे नेताजींनी ठिक 75 वर्षांपूर्वी नेताजींनी तिरंगा फडकावला होता. 



लोकसभा निवडणूकीत देशवासियांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तरुण मतदारांनी स्वत:ची नोंदणी करुन मतदान करावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाबद्दलही माहिती दिली. निवडणूक आयोग ही आपल्या देशातील महत्त्वाची संस्था आहे. जी आपल्या प्रजासत्ताकपेक्षाही जुनी आहे. 25 जानेवारीला निवडणूक आयोग स्थापना दिवस होता. हा दिवस 'राष्ट्रीय मतदाता' म्हणून ओळखला जातो. 30 डिसेंबर 2018 ला झालेल्या 'मन की बात'मध्ये त्यांनी प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले होते.