नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या तरुणांना महिलांचा आदर आणि स्वच्छ भारत मिशनचा संदेश दिला. स्वामी विवेकानंदांनी शिकागोतल्या धर्मपरिषदेत भाषणाची सुरूवात बंधू आणि भगिनिंनो अशी केली होती. त्यामुळे सारं जग अचंबित झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आपण आपल्या भारतात ही परंपरा पाळतो का? आपण महिलांचा आदर करतो का? असा प्रश्न पंतप्रधानांनी केला. त्याचप्रमाणे महिलांचा आदर करणाऱ्यांना १०० वेळा नमन करतो असंही मोदींनी म्हटलं. 


स्वच्छ भारत मिशनची महिती देताना पंतप्रधानांनी मोठ्या खुबीनं आपला संदेश तरुणांपर्यंत पोचहला. स्वामी विवेकानंदांनी शिकगोत  झालेल्या  धर्मपरिषदेत केलेल्या भाषणाला आज सव्वाशे वर्ष पूर्ण होताय. त्यानिमित्तानं दिल्लीत स्टुंडंट लीडर्स कन्व्हेशनचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.