चेन्नई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची चेन्नईतील भेट सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. चेन्नईच्या समुद्रकिनारी असणाऱ्या महाबलीपुरम या शहरात हे दोन्ही थांबले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. ते साधारण अर्धा तास याठिकाणी होते. यावेळी मोदी किनाऱ्यावरील प्लॅस्टिक आणि कचरा उचलताना दिसले. मोदींनी हा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किनाऱ्यावर जमवलेल्या गोष्टी (कलेक्शन) आपण हॉटेलमधील अधिकाऱ्याकडे सोपवल्याची मिष्किल टिप्पणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या या स्वच्छता अभिनयानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 


दरम्यान, आज चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज मोदी आणि जिनपिंग  व्यापार, दहशतवाद आणि अन्य आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. यानंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात येईल. याशिवाय, दुपारच्या सुमारास मोदी आणि जिनपिंग एकत्रपणे भोजनही करतील. यानंतर क्षी जिनपिंग चीनच्या दिशेने रवाना होतील.