पंतप्रधान मोदींनी केले काश्मिरी मुलाचे कौतुक
तलावात साठणाऱ्या बॉटल्स आणि प्लास्टिकच्या कचरा वेचून तो उदरनिर्वाह करतो.
नवी दिल्ली : 'मन की बात' च्या ३६ व्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका काश्मिरी तरुणाचे तोंडभरून कौतुक केले. बिलाल डार असे या काश्मिरी तरुणाचे नाव असून तो कचरा वेचक आहे. तो श्रीनगर महापालिकेच्या स्वच्छतेचा ब्रॅंड अम्बॅसिटर म्हणून काम करीत आहे. बिलाल 12 वर्षांपासून स्वच्छतेचे काम करीत आहे. त्याने आतापर्यंत १२ हजार टन कचरा साफ केला आहे.
कोण आहे बिलाल ?
बिलाल हा उत्तर काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात राहतो. वूलर तलाव येथे कचरा वेचून गुजराणा करीत आहे. तलावात साठणाऱ्या बॉटल्स आणि प्लास्टिकच्या कचरा वेचून तो उदरनिर्वाह करतो.
बिलालचे वडील मोहम्मद रमझन डार झोन वर कचरावेचकाचे काम करायचे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या मृत्यूनंतर बिलालची आई आणि दोन बहीणींची जबाबदारी बिलालवर आली. कुटुंबासाठी बिलालने तरुण वयात तलावातील कचऱ्यावर काम सुरु केले. याचे त्याला दररोज १५० ते २०० रुपये मिळतात.
जुलैमध्ये श्रीनगर महापालिकेने बिलालला स्वच्छतेसाठी आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनविले आहे. कचरा घेऊन जाण्यासाठी त्याला एक विशेष गाडी देण्यात आली आहे. आता तो शहराच्या वेगवेगळ्या भागातील लोकांना भेटून स्वच्छतेची जाणीव करून देतो.