PM Modi Speech in Parliament:  विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे लोकसभेत चांगलाच गदारोळ माजला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत  अविश्वास प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना  'सीक्रेट वरदान'  मिळाल्याचा टोला लगावला. 3 उदाहरण देऊन पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.  


विरोधकांना मिळालेय सिक्रेट वरदान - पंतप्रधान मोदी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांना सिक्रेट वरदान मिळालेय. विरोध लोकांच वाईट व्हाव असं चिंत करतात. मात्र, त्याच्या उलट घडते. ज्याचे वाईट व्हावे असा विचार ते करतात. त्यांचे आणखी चांगले होते. याच उदाहरण मी आहे. कारण, विरोधकांनी माझं वाई व्हावय असा विचार केला. पण, माझ चांगलच झालं. मी अधित यशस्वी होत गेलो असा दावा करत  पंतप्रधान मोदी यांनी 3 उदाहरणे देत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.   


बॅंकिग सेक्टर तेजीत आले


बॅंकिग सेक्टरला मोठा फटका बसेल. देश आर्थिक संकटात येईल असं विरोधकांनी परदेशातील विद्वानांकडून वदवून घेतले. बँकिग क्षेत्र बुडीत जावे असं विरोधकांना वाटत होते. मात्र, बँकिंग सेक्टरने दुप्पट नफ्यासह भरारी घेतली आहे. 


फोन बँकिग घोटाळा


विरोधकांनी फोन बँकिग घोटाळ्याचा आरोप केला होता. NPA चा दावा देखील केला होता. मात्र, बँकिंग सेक्टरने मोठी प्रगती केली आहे. 


जगात HAL  कंपनीची इमेज खराब करण्याचा प्रयत्न


डिफेंससाठी हेलिकॉप्टर बनवणारी सरकारी कंपनी HAL ची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना भडकवण्यात आले. मात्र,  या सर्व आरोपानंतर देखील HAL कंपनीची प्रगतीच झाली.  


 LIC बुडत असल्याचा आरोप


 LIC बुडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. गरीबांचा पैसा बुडणार आहे अशी अफवा देखील विरोधकांनी पसरवली. मात्र,   LIC कंपनीच्या शेअर्सने शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी घेतली आहे. लवकच भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास देखील पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.