आमचं पितृतुल्य छत्र हरपलं- पंतप्रधान मोदी
वाजपेयींच्या निधनानं एका युगाचा अंत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच निधन झाल्यानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आलंय. उद्या साडेचार वाजता राजघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आपला शोक व्यक्त करत श्रद्धांजली दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींच्या निधनानं एका युगाचा अंत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
न भरून येणार नुकसान
अटलजींनी मला संघटन आणि शासन याचे महत्व समजावले. दोन्ही समजण्यासाठी सहाय्य आणि ताकद दिली. त्यांच्या जाण्याने न भरून येणारे नुकसान झालंय. जनसंघ पासून भाजपा पर्यंतच्या संघटनाला त्यांनी मजबूत केल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. तसेच भाजपाच्या विचारांना अटलजींनी जनसामान्यापर्यंत पोहोचविल्यामुळेच भाजपाची यात्रा इथपर्यंत पोहोचली आहे. शरीररूपी ते आपल्यात नसले तरी त्यांची वाणी, नेतृत्व कायम आमच्यासोबत राहिल असे सांगत दु: ख व्यक्त केलं.
विजयघाटावर स्मारक
अटलजींच्या स्मारकासाठी दीड एकर जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांच स्मारक उभारण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच अटलजींचे पार्थिव दिल्लीतील त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आलं. सर्व भाजप कार्यालयातील झेंडे निम्म्यावर आणण्यात आले.