नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निसर्गावरचे प्रेम सोशल मीडिया पोस्टद्वारे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन कविता पोस्ट करण्यात आली आहे. या कवितेबरोबरच एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पीएम मोदी मोर सोबत दिसत आहेत. यात मोदी मॉर्निंग वॉक नंतर मोरांना दाणे टाकताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी नियमित सकाळी वॉकला गेल्यानंतर मोरांना दाणे टाकत असतात. पंतप्रधान मोदींच्या दिनचर्यामध्ये याचा समावेश आहे, ज्यांचे फोटो समोर आले आहेत.


व्हिडिओमध्ये दिसत असलेले फोटो पंतप्रधान मोदींच्या रूटीनची आहेत ज्यात ते पंतप्रधान निवास आणि लोककल्याण मार्गावरील त्यांच्या कार्यालयापर्यंत काम करताना दिसू शकतात. पीएम मोदींनी आपल्या निवासस्थानावर ग्रामीण भागाप्रमाणे पक्षी घरटे बांधू शकतात अशी रचना देखील केली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

भोर भयो, बिन शोर, मन मोर, भयो विभोर, रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना, मनमोहक, मोर निराला। रंग है, पर राग नहीं, विराग का विश्वास यही, न चाह, न वाह, न आह, गूँजे घर-घर आज भी गान, जिये तो मुरली के साथ जाये तो मुरलीधर के ताज। जीवात्मा ही शिवात्मा, अंतर्मन की अनंत धारा मन मंदिर में उजियारा सारा, बिन वाद-विवाद, संवाद बिन सुर-स्वर, संदेश मोर चहकता मौन महकता।


A post shared by Narendra Modi (@narendramodi) on


त्याचप्रमाणे पीएम मोदी अनेकदा मुलांसोबत बोलत असतात. अलीकडेच, मन की बात'मध्ये त्यांनी हरियाणातील टॉपर कृतिका नंदल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. या दरम्यान पीएम मोदी यांनी कृतिकाचे अभिनंदन केले आणि तिला आणखी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. पंतप्रधानांनी कृतिकाशी तिचा संघर्ष आणि अभ्यासाबद्दलही चर्चा केली.