भुज : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये झंझावाती प्रचाराला आजपासून सुरूवात केलीय. भुजमधल्या पहिल्याच सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातच्या मुलावर गुजरातमध्ये येऊनच खोटे आरोप करणाऱ्यांना गुजरातची जनता माफ करणार नाही असं मोदींनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरदार पटेल यांच्या काळात काँग्रेसनं गुजरातवर दुजाभाव केला. त्यावेळच्या जनतेनं ते सहन केलं. पण आजची स्थिती वेगळी आहे. आज तुम्ही असा अपमान सहन कराल का असा प्रश्न यावेळी मोदींनी केला. जनतेला भावनिक साद घालताना कच्छमध्ये लवकरच रो-रो सेवा सुरू करण्याचं आश्वासनही मोदींनी दिलं.