नवी दिल्ली :  कोरोनाची भीती अद्याप टळलेली नाही, त्यामुळे आपण अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'च्या माध्यमातून केले आहे. आपल्या देशातील लोकसंख्या सर्वात जास्त आहे, तरी देखील इतर देशांच्या  तुलनेत आपल्या देशातील रुग्णांची कमी आहे. आज देशातील चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. उद्या पासून देशाच्या काही भागांमध्ये पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरवात होणार आहे. त्यामुळे येते काही दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लॉकडाऊनच्या काळात अनेक माध्यमांच्या मदतीने इच्छाशक्तीवर भर दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब योग्य प्रकारे होताना  दिसत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं देखील सोपं जात आहे. असं म्हणत त्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचं कौतुक केलं आहे.  या करोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपली गरीब जनता, कामगार, श्रमिक वर्गाला बसला आहे. असं देखील ते या वेळी म्हणाले. 


यावेळी त्यांनी जनतेला योगाचे देखील महत्त्व पटवून दिले आहे. योगाचे जीवनात अत्यंत महत्त्व आहे. कोरोना संकटात योगा करणं गरजेचं आहे. जागतिक नेत्यांकडून योगाबाबत चौकशी सतत होत आहे. त्यामुळे योगासनांविषयी आयुष मंत्रालयाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  आंतरराष्ट्रीय  योग दिनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी देशातील जनतेला केलं आहे.  My Life, My Yoga नावाने आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ब्लॉगवर स्पर्धा सुरू केली आहे.


दरम्यान उद्यापासून  ५ वा टप्पा सुरू न होता अनलॉक-१ सुरू होत आहे. हा नवा टप्पा ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. अशा अनेक मुद्दयांवर  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेसोबत संवाद साधला.