अहमदाबाद : गुजरातच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा अयोध्येचा मुद्दा प्रकर्षानं समोर आलाय. काल सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी 2019च्या निवडणुकीपर्यंत खटल्याचं कामकाज पुढे ढकलण्याची विनंती केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमका हाच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. आज अहमदाबाद जिल्ह्यात धांडुका इथं झालेल्या सभेत मोदींनी काँग्रेसवर तुफानी हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली राममंदिराचं कामकाज थांबवण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय.