मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ नंतर मोदी स्वत: काही आमदार आणि खासदारांना फोन करून चर्चा करणार आहेत. देशांत भाजप पक्षाचे सरपंचापासून खासदारपर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी पक्षाच्या ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान भाजपाचे लोकप्रतिनिधी 20 हजारपेक्षा गावांत एक दिवस मुक्काम करणार आहेत. याकाळांत भाजपाने ग्रामीण भागाशी घेतलेले निर्णय लोकापर्यंत पोहचवणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रामस्वराज्य अभियानबाबत भाजपाच्या आमदार- खासदारांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.