नवी दिल्ली : येत्या २५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'पावर फॉर ऑल' योजना लॉन्च करण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील प्रत्येक घरात २४ तास वीज पूरवठा व्हावा यासाठी २५ सप्टेंबरपासून 'पावर फॉर ऑल' ही योजना लॉन्च करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी दिली आहे.


एका वृत्तवाहिनीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी म्हटलं की, "२५ सप्टेंबर रोजी नवी सुरुवात होणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व देशवासियांसाठी २४X७ म्हणजेच २४ तास वीज पूरवठा करण्यासाठी 'पावर फॉर ऑल' योजना लॉन्च करणार आहेत.


सर्व गावांना मिळणार वीज


आर के सिंह यांनी या स्कीमसंदर्भात अधिक माहिती दिलेली नाहीये. मात्र, त्यांनी सांगितलं की, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील सर्व गावांत वीज पूरवठा करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारसोबत वीज परियोजनांसंदर्भात चर्चा केली आहे. तसेच या नव्या योजनेसाठी फंडही देण्यात आला आहे.


मीटर आणि वायरवर मिळणार सबसिडी


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचं नाव 'सौभाग्य' असणार आहे आणि या योजने अंतर्गत ट्रान्सफॉर्मर, मीटर तसेच वायरवर सूट देण्यात येणार आहे. या योजनेचा गेल्या कॅबिनेट मिटींगच्या अजेंड्यात समावेश करण्यात आला होता.