पंतप्रधान मोदी आज प्रचारासाठी कर्नाटकात
नवी दिल्ली : आपल्या झंझावाती प्रचारासाठी प्रसिद्ध असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक निवडणूकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. प्रत्येक राज्याच्या निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले मोदी कर्नाटकात तब्बल १५ प्रचारसभा घेणार आहेत. म्हैसूर जिल्ह्यातून त्यांच्या प्रचारसभांना आजपासून सुरूवात होणार आहे. पाच दिवसांच्या प्रचारात मोदींच्या दररोज तीन सभांचं आयोजन करण्यात आलंय. मोदींसोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि फायरब्रँड प्रचारक योगी आदित्यनाथही स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरणार आहेत.
१० दिवस शिल्लक
अमित शाहांच्या ३० तर योगींच्या २० प्रचारसभा होणार आहेत. कर्नाटकमध्ये १२ मे रोजी मतदान आहे. प्रचारासाठी अखेरचे १० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून मोठ्या नेत्यांच्या सभांवर भर असणार आहे.