अहमदाबाद : ६९ व्या वाढदिवसानिमित्त गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचे आशीर्वाद घेतले. सरदार सरोवराचा दौरा केल्यावर पंतप्रधान मोदी निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांनी मातोश्रींसह भोजन केलं. त्यानंतर मोदींनी आईची विचारपूस केली.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढदिवसानिमित्त मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाची आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करत आहेत. आज दिवसभर मोदींचा कार्यक्रम ठरलेला आहे. सकाळी सव्वाआठच्या सरदार सरोवर इथे मोदींचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी केवडियात विविध प्रकल्पाची पाहाणी केली.


नर्मदेच्या तीरावर केवडिया इथे सरदार पटेलांच्या पुतळा परिसरात सुरू करण्यात आलेल्या उद्यानाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहणी केली. बॅटरीवर चालणाऱ्या कारमधून त्यांनी हा प्रवास सुरू केला. या प्रवासात मोदींनी वाटेत या उद्यानात साकारण्यात आलेलं प्राणीसंग्रहालय पाहिलं. मोदींनी या उद्यानातल्या निवडुंग उद्यानाला भेट देऊन निवडुंगांच्या विविध प्रजातींची पाहणी केली.


पंतप्रधान मोदींनी फुलपाखरांच्या उद्यानात जाऊन विविध प्रजातीची फुलपाखरं या उद्यानात सोडली. फुलपाखरांना बास्केटमधून उद्यानात सोडण्याचा हा सोहळा अतिशय नयनरम्य होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी उद्यानात उभारण्यात आलेल्या काही गृहउद्योगाच्या दुकानांना भेटी दिल्या.