खुशखबर! आज ९ करोड खात्यात जमा होणार १८ हजारो करोड रुपये
देशभऱातील जनतेसाठी अत्यंत महत्वाची बातमी
मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची २५ डिसेंबर रोजी जयंती आहे. हा दिवस सुशासन दिवस (Sushansan Divas) साजरा केला जातो. भाजप शुक्रवारी देशातील १९ ठिकाणांहून अधिक ठिकाणी कार्यक्रम साजरा करणार आहेत.
या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील ९ करोड शेतकऱ्यांना १८००० करोड रुपये सरळ बँक खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. २५ डिसेंबरला एका क्लीकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार कोटी रुपये ट्रान्सफर होतील असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. शेतकरी संघटनांनी सरकारचे कायदे समजून घ्यावेत. आम्ही खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार आहोत. सरकार सर्वांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा होणारेय. आज दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बटन दाबून शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता हस्तांतरित करतील. या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणारेत. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. ३ हप्त्यांत २ हजार रुपये दर ४ महिन्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा जमा केले जातात.
२ हजारांचा हफ्ता
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये देते. आतापर्यंत शेतकऱ्यांना ६ हफ्ते दिले गेले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा पहीला हफ्ता डिसेंबर २०१८ मध्ये दिला गेला होता