नवी दिल्ली : गेल्यावर्षी आजच्याच दिवशी म्हणजे ८ नोव्हेंबरला भाजप सरकारने नोटाबंदीसारखा देशाला धक्का देणारा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आज वर्ष पूर्ण झालं आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचलेल्या पावलांना जनतेनं पाठिंबा दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. जनतेच्या या पाठिंब्याबद्दल नोटाबंदीच्या वर्षपुर्ती निमित्त मोदींनी ट्विट्वरून आभार मानले.





दरम्यान, आज नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्तानं सरकार देशात काळा पैसा विरोधी दिन साजरा करतंय. तर दुसरीकडे काँग्रेस काळा दिवस पाळत आहे. याविषयी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नोटाबंदीमुळे काय काय फायदे झाले हे पुन्हा एकदा जावडेकर यांनी सांगितले आहे.