मोदींचा वाढदिवस, आईचा आशीर्वाद घेऊन केली कामाची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६७वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मोदींनी आपली आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६७वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मोदींनी आपली आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसाच्या दिवशी आपली आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी जातात. त्याचप्रमाणे यंदाही मोदींनी रविवारी पहाटेच आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी गांधीनगर येथे पोहचले.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या गाड्यांचा ताफा घराजवळच थांबवला आणि केवळ एका गाडीने त्यांनी घराच्या आवारात प्रवेश केला. नरेंद्र मोदी वाढदिवसाच्या दिवशी आपली आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतात आणि मग पुढील कार्यक्रमांना सुरुवात करतात.
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं पहायला मिळत आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील सरदार सरोवर नर्मदा बांध योजनेचं लोकार्पण करणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम
- वाढदिवसाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी केवडिया येथे सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण करणार
- यानंतर नरेंद्र मोदी साधूबेटला भेट देणार, या ठिकाणी उभारल्या जात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशातील सवार्र्त मोठ्या पुतळ्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. हा 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' पुतळा तब्बल १८२ मीटर उंच असणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपतर्फे सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. भाजपतर्फे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.