मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान एच डी देवेगौंडांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. मोदींनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्याचं ट्विट केलंय. जे़डीएस भाजपसाठी कर्नाटकातल्या सत्ताकारणात किती महत्वाची आहे हे वेगळं सांगायला नको. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देवेगौडांना आजच्या दिवशी शुभेच्छा देणं महत्वाचं मानलं जातंयं. तिकडे आज वाढदिवसाच्या दिवशी एच डी देवेगौडांनी तिरुपतीला जाऊन सपत्निक दर्शन घेतलं. कर्नाटकात मुलाला मुख्यमंत्रीपद मिळावं असंच साकडं भगवान व्यंकटेशाला देवेगौडांनी घातलं असावं.