द्वारका येथे देशातील पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था उघडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे बेंट आणि ओखा पूलाची कोनशिला रचली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. द्वारकाधीश मंदिरात पुजा अर्चा करुन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आदी मान्यवर पंतप्रधानांसोबत उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे बेंट आणि ओखा पूलाची कोनशिला रचली. आज द्वारकेचा अंदाज काही वेगळाच आहे. चारही बाजूस उत्साहाचे वातावरण असल्याचे त्यांनी सभेला संबोधले. द्वारकेत मी नवचैतन्याचा अनुभव घेत आहे. आज बांधला जाणारा हा पूल हजारों वर्षांच्या बाल्ट-द्वारकातील सांस्कृतिक वारसाशी जोडला जाईल. प्रवासी इथे आल्यावर द्वारकेचा आर्थिक विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच द्वारका येथे देशातील पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था उघडली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
एका कोपऱ्यात विकास होऊन पर्यटन यशस्वी होत नाही त्यामूळे आमचे सरकार राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून आर्थिक गतीविधी वाढविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, देशाला नवीन उंचीवर नेणे हे प्रत्येक देशाचे स्वप्न आहे. मच्छीमारांना कर्ज उपलब्ध केले जाईल. आपल्या समुद्रात ब्लू इकॉनॉमीची शक्यता आहे. जीएसटीमुळे देशभरात दिवाळीसारखे वातावरण असल्याचेही ते म्हणाले. राजकोटचे ग्रीनफील्ड विमानतळ, सहा लेनचा अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्ग आणि चार-लेन राजकोट-मोरबी राज्य रोडचा पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. सुरेंद्रनगरमधील जोरारनगर आणि रतनपूर भागात राज्य अत्याधुनिक दूध प्रक्रिया व पॅकेजिंग प्लॅंटस् आणि पिण्याच्या पाण्याची सोय पाईपलाईन देखील जोडली जाणार आहे. येथे ते एका सभेलाही संबोधित करणार आहेत.