कामगार- मजुरांसाठी पेंशन! फक्त 2 रुपये करा जमा मिळवा 36000 पेंशन
PM Shram Yogi Man Dhan Yojna : प्रधानमंत्री श्रम योगी मान धन (PM Shram Yogi Man Dhan Yojna) योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित अनेक लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यास मदत मिळेल.
नवी दिल्ली: PM Shram Yogi Man Dhan Yojana: पंतप्रधान श्रम योगी मन धन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक उत्तम योजना आहे. या अंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल. या योजनेंतर्गत मजुरांना पेन्शनची हमी सरकार देते. या योजनेत दररोज फक्त 2 रुपये वाचवून तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते.
दरमहिना 55 रुपये हफ्ता
या योजनेत दरमहा 55 रुपये जमा करून, 18 व्या वर्षी दररोज साधारण 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.
हे कागदपत्र गरजेचे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकेचे बचत खाते असणे गरजेचे आहे. लाभार्थ्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.