नवी दिल्ली : प्रत्येकाला आपल्या येणाऱ्या भविष्याची चिंता असते. परंतु अनेक वेळा भविष्याची आर्थिक गणितं बसवणं कठीण होतं. आर्थिक दृष्ट्या कमकूवत असलेल्या लोकांसाठी म्हातारपणात पैसे जमवणं कठीण होतं. त्यामुळे केंद्र सरकारने अनेक पेंशन योजना सुरू केल्या आहे. ज्यांचा लाभ घेऊन आपले भविष्य सुखकर बनवता येऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

36 हजार रुपयांची पेंशन
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (PM SYM) ही पेंशन स्किम असंघटीत श्रेत्रातील लोकांसाठी आहे. ज्यांना 36 हजार रुपये पेंशन दिली जाणार आहे. या स्किम अंतर्गत 18 ते 40 वर्ष वयाचे लाभ घेऊ शकतात. या योजनेत प्रीमियमची रक्कम वयानुसार निर्धारित केली जाते. वर्षाला 36 हजार रुपयांची पेंशन महिन्याला 3000 रुपये प्रमाणे दिली जाते. 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जनसेवा केंद्रात जाऊन आपण PM SYM खाते सुरू करू शकता. योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याडे आधारकार्ड आणि बँक पासबुक सारखे महत्वाचे पुरावे असायला हवे.