राजकारण्यांच्या संपत्तीबद्दल सामान्यांना नेहमीच अप्रुप असतं. यामध्ये देशाच्या राष्ट्रपतींपासून राज्याच्या एखाद्या मंत्र्यांची संपत्ती किती असेल याबाबत जाणून घेण्याची सामान्यांना नेहमीच इच्छा असते. निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारेच अशी माहिती आपल्याला कळू शकते. मात्र त्याचेही स्त्रोत काही लोकांपुरते मर्यादित असतात. त्यामुळे याबाबत सर्वांपर्यंत माहिती पोहोचत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या संपत्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संपत्तीत 26 लाख रुपयांची वाढ (PM Modi wealth increased) झाली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांची एकूण संपत्ती आता 2.23 कोटी रुपये झाली आहे. यातील बरेच पैसे बँकमध्ये जमा आहेत.


मात्र पंतप्रधान मोदींकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही, कारण त्यांनी गांधीनगरमधील त्यांच्या नावे असलेली जमीन दान केली होती.


शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक नाही


पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) वेबसाइटवर दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांची बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये कोणतीही गुंतवणूक नाही. परंतु त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत 1.73 लाख रुपये आहे. 


पंतप्रधान मोदींच्या जंगम मालमत्तेत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 26.13 लाख रुपयांची वाढ झाली आहे. परंतु त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही, ज्यांची किंमत 31 मार्च 2021 रोजी 1.1 कोटी रुपये होती.


पीएमओच्या वेबसाईटनुसार 31 मार्च 2022 रोजी पंतप्रधान मोदी यांच्याकडे एकूण 2,23, 82,504 रुपये इतकी संपत्ती आहे. 
मार्च 2021 अखेर पंतप्रधान मोदींची चल संपत्ती 1,97,68,885 रुपये होती. ती मार्च 2022 अखेरीस 2,23,82,504 रुपये इतकी वाढली आहे. 


पंतप्रधान मोदी यांच्या नावावर गुजरामध्ये एक निवासी भुखंड आहे. गुजरातच्या गांधीनगरमध्ये रिअल इस्टेट सर्व्हे क्रमांक 401/अ या भुखंडात तिघे भागीदार असून त्यामध्ये पंतप्रधान मोदीही आहेत. यामध्ये प्रत्येकाकडे जमीनीची 25 टक्के मालकी आहे. तसेच उर्वरित 25 टक्के भाग दान करण्यात आला आहे. या जागेची बाजार भावानुसार किंमत 1.10 कोटी रुपये आहे.


पंतप्रधान मोदींकडे एकूण 35,250 इतकी रोख रक्कम आहे. तर पोस्टामध्ये 9,05,105 रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि 1,89,305 रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.


दरम्यान, यासह अन्य दहा मंत्र्यांच्या संपत्तीबाबतही माहिती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे 31 मार्च 2022 पर्यंत 2.54 कोटी रुपयांची चल तर 2.97 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची चल संपत्ती 35.63 कोटी आहे. 


सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे एकूण 1.43 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 8.21 कोटी रुपयांची संपत्ती आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे एकूण 1.83 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 2.92 कोटींची संपत्ती आहे.