PNB MySalary : तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला संपूर्ण 20 लाख रुपयांचा लाभ मोफत मिळेल. या विशेष ऑफरसाठी तुम्हाला बँकेत PNB MySalary खाते उघडावे लागेल. एवढेच नाही तर यामध्ये बँकेकडून तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. आम्ही तुम्हाला या खात्याबद्दल तपशीलवार माहिती सांगत आहोत.


PNB या सुविधा पुरवणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PNB ने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला तुमचा पगार अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करायचा असेल तर 'PNB MySalary Account' खाते उघडा. या अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीसोबत वैयक्तिक अपघात झाला असेल, तर ओव्हरड्राफ्ट (अतिरिक्त पैसे काढणे) आणि स्वीपची सुविधा विम्यासोबत उपलब्ध होईल.


20 लाखांचा फायदा कसा मिळेल?


PNB सॅलरी अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांना विमा संरक्षणासह इतर अनेक फायदे देत आहे. शून्य शिल्लक आणि शून्य त्रैमासिक सरासरी शिल्लक सुविधेसह PNB MySalary खाते उघडल्यावर, तुम्हाला 20 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात संरक्षण दिले जात आहे.



या खात्यात 4 श्रेणी आहेत


- 10 हजार ते 25 हजारांपर्यंत मासिक वेतन असलेल्यांना 'सिल्व्हर' श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
- 25001 ते 75000 रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्यांना 'गोल्ड' श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
- 75001 रुपयांपासून 150000 रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्यांना 'प्रिमियम' श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
- 150001 रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेल्यांना 'प्लॅटिनम' श्रेणीत ठेवण्यात आले आहे.


बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा


- सिल्व्हर कॅटेगरीतल्या ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल.
- गोल्ड कॅटेगरीतल्या ग्राहकांना 150000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल.
- प्रीमियम कॅटेगरीतल्या ग्राहकांना 225000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल.
प्लॅटिनम कॅटेगरीतल्या ग्राहकांना 300000 पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल.


https://www.pnbindia.in/salary saving products.html या लिंकवर जाऊन तुम्ही तपशीलवार माहिती मिळवू शकता.