Punjab National Bank FD Interest Rate : PNB बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खूश केले आहे. तुमच्या कुटुंबातील कोणाचे खाते पंजाब नॅशनल बँकेत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अलीकडेच, देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात दोनदा वाढ करण्याची घोषणा केली होती. वाढलेले दर बँकेने 26 ऑक्टोबरपासून लागू केले आहेत. ही वाढ दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर (FDs) करण्यात आली आहे.


19 ऑक्टोबरपासून ही विशेष योजना सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंजाब नॅशनल बँक (PNB) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देणार असल्याचे बँकेने पुन्हा एकदा सांगितले. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे. बँकेच्या निवेदनात म्हटले आहे की, 'बँक दरवर्षी 7.85 टक्क्यांपर्यंत उच्च व्याज दर देत आहे'. (अधिक वाचा - घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी)


बँकेच्यावतीने अधिक माहिती देताना सांगतले की, ही योजना ज्येष्ठ नागरिक (60-80 वर्षे) आणि अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी (80 वर्षे व त्यावरील) आहे. या अंतर्गत दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा केली जाऊ शकते. बँकेने दिलेला उच्च व्याजदर सर्व सरकारी आणि खासगी बँकांपेक्षा जास्त आहे. आगामी काळात इतर बँकांकडूनही अशी घोषणा होऊ शकते. यापूर्वी या योजनेत 6.50 ते 7.30 टक्के व्याज दिले जात होते.


रेपो दरात 1.90 टक्के वाढ यानंतर सर्व खासगी आणि सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ करुन त्याचा फायदा ग्राहकांना दिला आहे. याशिवाय बचत खात्याच्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरावरही झाला आहे.