मुंबई : पब्लिक सेक्टर बँक पंजाब नॅशनल बँकेत तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएनबी बँकेने विविध कालावधींच्या १० कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटवरील व्याजदरात १.२५ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा शनिवारी केली. नवे व्याजदर एक जानेवारीपासून लागू होणार आहेत. 


बँकेच्या माहितीनुसार, एक कोटी रुपयांच्या रकमेसाठी ७ ते २९ दिवसांच्या डिपॉझिटवरील व्याजदर ४ टक्क्यांवरुन वाढवून ५.२५ टक्क्यांपर्यंत वाढवलेत. याप्रमाणाचे ३० ते ४५ दिवसांच्या डिपॉझिटवरील व्याजदर ४.५० टक्क्यांवरुन वाढवून ५.२५ टक्के केलेत. 


४६ ते ९० दिवसांच्या डिपॉझिटवर ६.२५ व्याजदर मिळेल. आधी ५.५ इतका व्याजदर होता. ९१-१७९ दिवसांच्या डिपॉझिटवर व्याजदर सहा टक्क्क्यांवरुन वाढवून ६.२५ टक्के इतका करण्यात आलाय.


किती वाढला व्याजदर


बँक एक ते दहा कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या रकमेसाठी  ७ ते ४५ दिवसांच्या डिपॉझिटवर आता चार टक्क्यांऐवजी ४.८ टक्के व्याज देणार. त्याप्रमाणेच ४६ ते १७९ दिवसांच्या डिपॉझिटवर चार टक्क्यांऐवजी ४.९ टक्के व्याज देणार आहे. १८८ ते ३४४ दिवसांच्या डिपॉझिटवर ४.२५च्या ऐवजी पाच टक्के व्याज मिळणार आहे.