मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतर्फे PNB@Ease आऊटलेट हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. या मॉडेलअंतर्गत बँकेच्या शाखेत न जाता बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार आहे. बचत खात्यांपासून ते विविध कर्जे प्राप्त करण्यापर्यंत विविध सेवांचा लाभ या प्रकल्पाच्या माध्यमांतून घेता येणार आहे. येत्या काळात देशातील 165 ठिकाणी PNB@Ease आऊटलेट सुरू करण्यात येणार आहेत.
 
 PNB@Ease आऊटलेटमध्ये 5 किओस्क असतील. त्यात एटीएम, रोख स्विकारणारा ऍक्सेप्टर, खाते सुरू करण्यासाठीचा किओस्क, कार्ड जारी करणारा किओस्क आणि इंटरनेट सक्षम किओस्क यांचा सामावेश आहे.  या सुविधेअंतर्गत एकाच ठिकाणी सर्व बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 
 
 याव्यतिरिक्त PNB@Ease आऊटलेट्स बँकेच्या वितरण क्षमतेला चालना देतील तसेच ग्राहकांचा शाखेत फेरी मारण्याचा खर्च कमी होईल,
 
 अशा प्रकारच्या पहिल्या आऊटलेटचे उद्घाटन नवी दिल्ली येथील केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन येथे  करण्यात आले आहे.