या बँकेने Fixed Depositचे दर बदलले, जाणून घ्या एफडीवर आता किती व्याज मिळेल
PNB Fixed Deposit Rates: बँकांकडून एफडीवरील (Fixed Deposit) व्याज दरात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मुंबई : PNB Fixed Deposit Rates: बँकांकडून एफडीवरील (Fixed Deposit) व्याज दरात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, या महिन्यात अनेक बँकांनी व्याजाचे दर बदलले आहेत. आता पंजाब नॅशनल बँकही यात समाविष्ट झाली आहे. पीएनबीने मुदत ठेवीचे (PNB Fixed Deposit Rates) व्याज दर बदलले आहेत. नवीन दर केवळ 1 मे 2021 पासून लागू आहेत. पीएनबी 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर 3 ते 5.25 टक्के व्याज देत आहे.
जर तुम्ही पीएनबीमध्ये (PNB) मुदत ठेव (Fixed Deposit) देखील ठेवली अतेल तर तुम्हाला नवीन दरांची माहिती असावी. पीएनबी 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज देत आहे. 5.1 टक्के 1 वर्षाच्या मुदतीसाठी व्याज देत आहेत. सर्वाधिक व्याज दीर्घकालीन एफडीवर आहे, तो म्हणजे 5.25 टक्के आहे.
पीएनबी एफडी व्याज दर बदलते
कालावधी FD साठी नवीन दर
7 दिवस ते 14 दिवस 3.00 टक्के
15 दिवस ते 29 दिवस 3.00 टक्के
30 दिवस ते 45 दिवस 3.00 टक्के
46 दिवस ते 90 दिवस 3.25 टक्के
91 दिवस ते 179 दिवस 4.00 टक्के
180 दिवस ते 270 दिवस 4.40 टक्के
271 दिवस - 1 वर्षांपर्यंत 4.50 टक्के
1 वर्षांपर्यंतचा कालावधी 5.10 टक्के
1 वर्ष - 2 वर्षांपर्यंत 5.10 टक्के
2 वर्ष - 3 वर्षांपर्यंत 5.10 टक्के
3 वर्ष - 5 वर्षांपर्यंत 5.25 टक्के
5 वर्ष - 10 वर्षांपर्यंत 5.25 टक्के
ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदा
ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर दीड टक्के अधिक व्याज मिळते. म्हणजेच सात दिवस ते दहा वर्षांच्या कालावधीत एफडीवर त्यांना 3.5 टक्के आणि 5.75 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.
या बँकांनी व्याज दरात केला बदल
पीएनबीच्या आधी पहिल्यांदा IDFC First Bank, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि येस बँकेनेही या महिन्यात आपल्या मुदत ठेवीवरील व्याज दरात बदल केला आहे.