नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत मौन सोडलेलं नाही. याच मुद्यावरून  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान आणि अर्थमंत्री अरुण जेटलींवर  जोरदार टीकास्त्र केलंय. तुम्ही अपराधी असल्यासारखे गप्प का बसला आहात असा खरमरीत सवाल राहुल गांधींनी ट्विटरवरून विचारलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. न खाऊंगा ना खाने दुंगा हे तुमचे धोरण होते त्याचे नेमके काय झाले, हे देशाला सांगाल का? असेही राहुल गांधी यांनी विचारले आहे.




११ हजार ४०० कोटी रुपयांना चुना लावून नीरव मोदी देश सोडून फरार झाला आहे. तसेच त्याच्याआधी विजय मल्ल्याही ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळाला आहे. या सगळ्यात स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेणारे पंतप्रधान मोदी कुठे आहेत? असा प्रश्न राहुल गांधी ट्विटरद्वारे विचारलाय. तसेच #ModiRobsIndia हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.


पंतप्रधान मोदी हे नीरव मोदी, विजय माल्ल्या आणि ललित मोदी प्रकरणांवर काहीही भाष्य करत नाहीत. यावरूनच ते कोणाशी प्रामाणिक आहेत हे स्पष्ट होते आहे, असेही राहुल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेय.