मुंबई : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) पीएनबीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पीएनबीने त्यांच्या अनेक सेवांसाठी शुल्क वाढवले ​​आहे. बँकेने एनईएफटी (National Electronic Funds Transfer), आरटीजीएस (Real Time Gross Settlement) यासह शुल्कात वाढ केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेने केलेली ही दरवाढ 20 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे. PNB ने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस ई-आदेशाचे शुल्क देखील सुधारित केले आहे. 


RTGS च्या नियमात बदल


पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, ऑफलाइन व्यवहारांसाठी आरटीजीएस शुल्क 24.50 रुपये आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी 24 रुपये करण्यात आले आहे, तर पूर्वी शाखा स्तरावर ऑफलाइन व्यवहारांसाठी आरटीजीएस शुल्क 20 रुपये होते. याशिवाय, 5 लाख आणि त्याहून अधिक रकमेसाठी RTGS शुल्क 40 रुपयांवरून 49.50 रुपये करण्यात आले आहे. त्याची ऑनलाइन फी 49 रुपये करण्यात आली आहे.


NEFT च्या शुल्कात बदल


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे संचालित नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) च्या शुल्कामध्ये बदल करण्यात आले आहेत. PNB वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 'ऑनलाइन सुरू केलेल्या NEFT निधी हस्तांतरणासाठी बचत खातेधारकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.' 
बचत खात्‍यांवर आणि पीएनबीच्‍या बाहेर होणार्‍या व्‍यवहारांशिवाय इतर व्‍यवहारांवर NEFT शुल्‍क लागू आहेत.


नवीन शुल्क जाणून घ्या


PNB ने दिलेल्या माहितीनुसार, 10,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर, NEFT शुल्क वाढून 2.25 रुपये झाले, जे आधी 2 रुपये होते. यासाठी ऑनलाइन शुल्क 1.75 रुपये झाले आहे.


शाखा स्तरावरील व्यवहारांसाठी 10,000/- रुपयांपेक्षा जास्त आणि 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी 4 रुपयांवरून 4.75 रुपये शुल्क वाढवण्यात आले आहे, तर ऑनलाइन व्यवहारांसाठी 4.25 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.


त्याच वेळी, 1 लाख रुपयांहून अधिक आणि 2 लाख रुपयांपर्यंतचे शुल्क 14 रुपयांवरून 14.75 रुपये आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी, 14.25 रुपये करण्यात आले आहेत. 2 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी ते 2 रुपयांवरून 24.75 रुपये करण्यात आले आहे.