नवी दिल्ली : देशात राष्ट्रीय बॅंकांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर देण्यात येत आहेत. आता आणखी तीन बॅंकांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. याबाबची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला यांनी केली. त्यामुळे आता पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक विलीनीकरण करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक विलिनीकरण केले जात आहे. या विलिनीकरणानंतर ही देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक ठरणार आहे. या कंपनीचा व्यवसाय १७.९५ लाख कोटींचा होणार आहे.



दरम्यान, कॅनरा आणि सिंडिकेट बँक यांचे देखील विलीनीकरण केले जाईल. देशात फक्त १२ सरकारी बँका असतील. ४ मोठ्या सरकारी बँकांमध्ये ६ लहान बँकांचे विलीनीकरण केले जाईल. विलीनीकरणानंतर पीएनबी देशातील दुसरी सर्वात मोठी बँक होईल.



कॅनरा बँकेत सिंडिकेट बँक विलीन होईल. ही देशातील चौथी सर्वात मोठी बँक बनेल. या बँकेचा व्यवसाय १५.२० लाख कोटी असेल. युनियन बँक ऑफ इंडिया आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक विलिनीकरण करण्यात येणार आहे. विलीनीकरणानंतर, ही देशातील पाचव्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असेल.



इंडियन आणि अलाहाबाद बँक यांचेही विलिनीकरण होईल. ही देशातील सातव्या क्रमांकाची बँक बनेल. विलीन झाल्यानंतर ८.०८ लाख कोटी रुपयांची भांडवल असलेली ही सातवी मोठी बॅंक असेल. दरम्यान, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक यांचे विलीनीकरण केले जाणार नाही. बँक ऑफ इंडियाचा व्यवसाय ९.३ लाख कोटी तर सेंट्रल बँकेचा व्यवसाय ४.६८ लाख कोटी असेल, असे अर्थमंत्री निर्माला म्हणाल्यात.