मुंबई : हिरे व्यापारी निरव मोदी याने गंडा घातलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला तीन महिन्यात तब्बल ९४० कोटींना तोटा झालाय. दरम्यान, १३ हजार कोटी रुपयाच्या घोटाळयामुळे पंजाब नॅशनल बॅंक अर्थात पीएनबी बँक पुन्हा एकदा चर्चेत आलेय. या बॅंकेला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान,  ही परिस्थती निर्माण होण्याकरिता निरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शेअर बाजारातील वातावरण असमाधानकारकच दिसून येत आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून चालू तिमाहीचा अहवाल सादर केला आहे. एप्रिल - जूनमध्ये ९४० कोटी रुपयाचे नुकसान झाले हा तोटा सलग दुसऱ्यांदा झाले असल्याची नोंद यावेळी करण्यात आलेय.


जानेवारी-मार्च तिमाहीत १३ हजार ४१६. १९ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर चालू तिमाहीचा आकडा एकत्रित केल्यानंतर तो १५ हजार ७२ कोटी पर्यंत पोहोचत असल्याची माहिती देण्यात आली. व्याज दरात २२ टक्क्यांनी  वाढीसह ४  हजार ६९२ कोटी रुपये झाले. एप्रिल - जून २०१७ मध्ये हा आकडा ३ हजार ८५५ कोटीवरपर्यंत होता. 


शेअर बाजारात ५ टक्के घसरण झाल्यानंतर पीएनबी शेअर्समध्ये बीएसई आणि एनएसईच्या समभागात ८५.४० रुपयापर्यत घसरण नोंदवण्यात होती. सोमवारी यात बीएसई ९०.१५आणि एनएसईत ९०.०५ रुपयावर खरेदी विक्री बंद झाली. तर एप्रिल-जूनमध्ये बँकेकडून नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांच्या आदेशानूसार एनपीए खात्यातील 336 कोटी रुपयाची वसूली करण्यात आली आहे.


मागील तिमाहीतही मोठय़ा नुकसानीची नोंदणी करण्यात आली होती. जानेवारी -मार्च मध्ये झालेले पीएनबीला १३ हजार ४१६.१९ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात जादा तिमाही तोत्यांची नोंदणी केली असल्याची माहिती देण्यात आलेय.