नवी दिल्ली : पीएनबी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आज सलग तिसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 


पंतप्रधानांनी उत्तर द्यावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या खासदारांनी १२ हजार ७०० कोटींच्या भ्रष्टाचाराप्रकरणी पंतप्रधानांनी उत्तर द्यावं अशी मागणी लावून धरली. तर अण्णा द्रमुक आणि आपचे खासदार वेलमध्ये उतरून पेरियार यांच्या पुतळ्याच्या विटंबनाचा निषेध केला. तर आंध्रप्रदेशला विेशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलगू देसमच्या खासदारांनी घोषणाबाजी केली.


शिवसेनेची घोषणाबाजी 


तर शिवसेनेचे खासदार मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी घोषणाबाजी करत होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवरचा हा गदारोळ वाढल्यानं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.