Crime News : पोलीस कोठडीमधून गुंडाला बाहेर काढणं एका आमदाराला महागात पडलं आहे. गुंडाला न्यायालयात हजर करत असताना पोलिसांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. मात्र आरोपींचा हा प्लॅन अपयशी ठरला, या सर्व प्लॅनिंगचा सुत्रधार हा माजी आमदार असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. (Police car was attacked while presenting criminal in court MLA Deep Narayan Singh arrested latest marathi crime news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


नक्की काय आहे प्रकरण? 
उत्तर प्रदेशमधील कुख्यात आरोपी लेखराज सिंह याला कोर्टात नेत असताना त्यावेळी पोलिसांचा पाठलाग करत गाडीवर हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आरोपी लेखराजने पोलीस स्टेशनच्या भिंतीला डोकं मारून घ्यायला सुरूवात केली. पोलिसांनी त्याला पकडल्यावर, मला सोडवण्यासाठी ते आले होते तुम्ही जाऊन दिलं नाही म्हणून आत्महत्या करून तुम्हालाच यामध्ये अडकवणार असल्याचं लेखराज सिंह म्हणाला. 


असा झाला होता पोलिसांच्या गाडीवर हल्ला? 
पोलीस लेखराजला न्यायालयात घेऊन जात असताना UP 93 BR 1100  या नंबरची गाडी वापरण्यात आली होती. ही गाडी नगर पंचायत अध्यक्ष अनिल यादवच्या घरातून जप्त करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अनिललाही अटक केली आहे. बाकी आरोपी  फायरिंग करून पळून गेले होते. 


हा संपूर्ण कट समाजवादी पक्षाचे माजी आमदार दीप नारायण सिंग यांनी रचल्याचं समोर आलं आहे. रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला होता मात्र त्यावेळी तो फरार होण्यात यशस्वी ठरला होता. मात्र नारायण सिंग फार काही काळ पोलिसांपासून लपू शकला नाही. अखेर सोमवारी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.