हायवेवर कारमध्ये एका महिलेसह होते 6 पुरुष, दरवाजा उघडून पाहिलं तर सगळे विनाकपडे....; पोलीसही चक्रावले
पोलिसांनी कारवाई केलेल्यांमध्ये 1 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले. महिला पोलिसांच्या मदतीने कारमध्ये पुरुषांसह असणाऱ्या महिलेला बाहेर काढण्यात आलं.
उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगर जिल्ह्यात पोलिसांनी कारमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्या सात लोकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण हायवेवर कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत होते. महिला पोलिसांच्या मदतीने कारमध्ये पुरुषांसह असणाऱ्या एकट्या महिलेला बाहेर काढण्यात आलं. चौकशीनंतर सर्वांना अटक करण्यात आलं. कारमधील एकजण बँकेचा कर्मचारी असल्याची माहितीही समोर आली आहे.
आंबेडकर नगर हायवेवर कारमध्ये अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.
पहिली घटना 21 सप्टेंबरला रात्री उशिरा बसखारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे पोलिसांनी सहा पुरुष आणि एका महिलेला कारमध्ये अश्लील कृत्य करताना रंगेहाथ पकडलं. तर दुसरी घटना 24 सप्टेंबरला बेवाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी रात्री गस्त घालताना एक महिला आणि दोन पुरुषांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून, जेलमध्ये रवानगी केली आहे.
झालं असं की, 21 सप्टेंबरला आंबेडकरनगच्या बसखारी पोलीस ठाण्यातील पोलीस रात्री गस्त घालत होते. यावेळी आजमगढ हायवेवर एक कार उभी असल्याचं त्यांना दिसलं. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी कारजवळ जाऊन पाहिलं असता त्यांना धक्काच बसला. कारमध्ये सर्वजण अश्लील कृत्य करत होते, ज्यामध्ये 6 पुरुष आणि एक महिला होती.
यानंतर पोलिसांनी महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने महिलेला बाहेर काढलं. यानंतर सर्व पुरुषांना एक एक करुन बाहेर काढण्यात आलं. चौकशीनंतर सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करत जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी 10 कंडोम, 1710 रुपये, 7 मोबाईल जप्त केले आहेत. गाडीवर एका पक्षाचा झेंडाही लावण्यात आला होता. पोलिसांनी ही गाडीही जप्त केली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत जेलमध्ये पाठवलं आहे.
एका गाडीत 2 पुरुष आणि 1 महिला
अशाचप्रकारे 24 सप्टेंबरला बेवाना पोलिसांनी रात्री उशिरा जनपदच्या बॉर्डर बॅरियरवर चेकिंगदरम्यान एका कारला रोखलं होतं. यावेळी कारमध्ये एक महिला आणि दोन पुरुष आक्षेपार्ह स्थितीत आढळले. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं. पुरुषांनी आपण लखनऊचे रहिवासी असल्याचं सांगितलं. कारमध्ये तीन पॅकेट कंडोम, 2600 रुपये, 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.