अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय. मात्र त्याआधी भाजप आणि काँग्रेसला अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे. 


रोड शोला परवानगी नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि काँग्रेसच्या रोड शोला अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली आहे. भाजपने अहमदाबादच्या धरणीसर देरासरपासून बापूनगरपर्यंत रोड शो काढण्याची परवानगी मागितली होती. तर काँग्रेसने जगन्नाथ मंदिरापासून मेमको चार रस्त्यापर्यंत रोड शोची परवानगी मागितली होती.


रोड शोचा मार्ग संवेदनशील


12 डिसेंबरला म्हणजे उद्या चौक सभा आणि चौक सभांसाठी परवानगी मागितली होती. मात्र या रोड शोचा मार्ग संवेदनशील असल्यामुळे आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली आहे