नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीच्या जाफराबाज, मौजपूर, मुस्तफाबाद, शिव विहार, सीलमपूर या भागांमध्ये दंगल निर्माण झाली होती. यावेळी दिल्ली पोलीसांवर बंदूक उगारणाऱ्या शाहरुखचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. त्याचा परिवार तेव्हापासून गायब आहे. शाहरुख, आम आदमी पार्टीचा नगरसेवक ताहिर हुसैन याच्यासोबतच शाहरुखच्या परिवाराचा शोध देखील घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलीसांना शाहरुखच्या घरुन संशयित वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ सापडले.


एसिड, पेट्रोल बॉम्ब आणि वीट- दगड आढळले. शाहरुख पोलिसांच्या हाथी सापडणं खूप महत्वाचे आहे. दंगल घडवण्याऱ्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी शाहरुख महत्वाचे माध्यम असल्याचे दिल्ली पोलीस सांगतात. 


पोलिसांनी मारलेल्या छाप्यांमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल-डीझेलचे कॅन सापडले. घरांमध्ये २०-२० किलोपेक्षा जास्त लोखंडी खिले, काचा सापडल्या. इतरांवर दुरहून पेट्रोल आणि एसिड बॉम्ब फेकून जखमी करण्यासाठी याचा उपयोग होणार होता.



३६ जणांना अटक 


ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी दंगलीतील २३ आणि शस्त्रास्त्र कायद्यातील ३६ जणांना अटक केली आहे.


पोलिसांनी ३६ देशी पिस्तूल, ३ पिस्तूल आणि ४८ काडतुसे जप्त केल्या आहेत.


हिंसाचाराच्यावेळी अनेक लोकांच्या गाडय़ांची, घरांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानाचे घर जाळण्यात आले होते. या जवानाला मदत करण्यासाठी बीएसएफने आता पुढाकार घेतला आहे.