धक्कादायक : योगींच्या सभेत महिलेचा बुरखा उतरवला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बलिया शहरात झालेल्या सभेतला एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बलिया शहरात झालेल्या सभेतला एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय.
या सभेसाठी आलेल्या एका महिलेला पोलिसांनी भर सभेत तिचा बुरखा उतरवण्यास भाग पाडलं. एवढ्यावर महिला पोलीस अधिकारी थांबली नाही तर त्यांनी महिलेचा बुरखाही जप्त केला.
विशेष म्हणजे, जिचा बुरखा उतरवून जप्त करण्यात आला ती महिला अनेक वर्षांपासून भाजपचीच कार्यकर्ती आहे.
याप्रकरणी वरिष्ठ पोलिसांनी चौकशीसाठी बुरखा उतरवणे किंवा जप्त करणे चुकीचे आहे, असे झाले असेल तर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिलंय.