नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं आहे. काँग्रेसचे संकटमोचक ते राष्ट्रपती आणि नंतर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न मिळवलेल्या प्रणव मुखर्जींची कारकीर्द उत्तुंग होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ राजकारणात आणि सत्तेत राहिलेले नेते म्हणून प्रणव मुखर्जी यांचं नाव घेतलं जातं. 


प्रणव मुखर्जींचा राजकीय प्रवास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९६९ साली प्रणव मुखर्जी पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार झाले. १९७३ साली त्यांना पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, तर १९८४ साली ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले. २००४ साली प्रणवदा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकले. 


२०१९ साली प्रणव मुखर्जींना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २००८ साली त्यांना पद्म विभूषण, १९९७ साली सर्वश्रेष्ठ खासदार आणि १९८४ साली सर्वश्रेष्ठ अर्थमंत्री असे पुरस्कार प्रणव मुखर्जींना मिळाले. 


राजकारणाचे 'दादा' प्रणव मुखर्जी


१९६९ साली पहिल्यांदा राज्यसभा खासदार 


१९७३ साली इंदिरा गांधी सरकारमध्ये उपमंत्री 


१९७५ साली दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार 


१९८१ साली तिसऱ्यांदा राज्यसभा खासदार 


१९८४ साली इंदिरा गांधी सरकारमध्ये अर्थमंत्री


१९८४ सालच्या सर्व्हेमध्ये जगातले सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री 


१९९१ साली योजना आयोगाचे उपाध्यक्ष 


१९९३ साली चौथ्यांदा राज्यसभा खासदार


१९९५ साली नरसिंह राव सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री 


१९९९ साली पाचव्यांदा राज्यसभा खासदार


२००४ साली पहिल्यांदा लोकसभा खासदार


२००४ साली युपीए-१ सरकारमध्ये संरक्षण मंत्री 


२००६ साली युपीए-१ सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री 


२००९ साली युपीए-२ सरकारमध्ये अर्थमंत्री


२०१२ साली भारताचे १३वे राष्ट्रपती 


२०१७ साली राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ समाप्त


२०१९ साली भारतरत्न पुरस्काराने गौरव