नवी दिल्ली : Political News : महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. (Political developments in Delhi) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दिल्लीत पक्षांतर्गत बदलाबाबत बैठक घेत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) राज्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करत राजधानीत दाखल झालेत. त्यातच जयपूर दौऱ्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Sharad Pawar , Devendra Fadnavis, Chandrakant Patil in Delhi)


नारायण राणे यांचे मोठे वक्तव्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्राबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि बी. एल. संतोष यांच्यात दिल्लीत बैठकही झाली आहे. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राणे यांनी सरकार बदलण्याच्या स्फोटक वक्तव्यानंतर राजकारण अधिकच तापले आहे.


शरद पवारही दिल्लीत पोहोचले


दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज दुपारी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीत पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत शरद पवार हेही मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे भाजप राष्ट्रवादीला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करू शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.


राणे यांचे राजकारणाबाबत मोठे वक्तव्य


केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, असे त्यांनी म्हटले आहे. राणे यांनी राजस्थानमधील जयपूर येथे सांगितले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर तेथे बदल दिसतील.


'भाजपचे सरकार आल्यानंतर बदल दिसेल'


केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे जयपूर दौऱ्यावर पोहोचले होते. महाराष्ट्रातील वातावरणाबाबत राणे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे असे वातावरण निर्माण केले जाते. मात्र मार्चपर्यंत तेथे भाजपचे सरकार स्थापन होईल. यानंतर अपेक्षित बदल दिसून येईल. पुढे राणे म्हणाले की, सरकार पाडणे आणि स्थापन करणे हे सीक्रेट आहे.