नागपूर: देशावर सध्या नागपुरातून नियंत्रण ठेवले जात आहे. नागपुरातून देशभरात विशिष्ट विचारसरणीचा प्रचार केला जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला. ते शनिवारी ऑल इंडिया प्रोफेशनल कॉंग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'लोकशाहीतील संघर्ष' या परिसंवादात बोलत होते. 
 
यावेळी कपिल सिब्बल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. १९५० नंतर पहिल्यांदाच  सरकार व एखादा पक्ष यांच्यात अंतर नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. ही स्थिती निश्चितच चिंताजनक आहे. २०१९ च्या निवडणूका बक्कळ पैसा खर्च करणारा पक्षच जिंकेल असे वक्तव्यही त्यांनी केले.