New Parliament Building : संसदेच्या नव्या त्रिकोणाकृती इमारतीचं उद्घाटन येत्या 28 मे रोजी होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी नेमका स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा मुहूर्त शोधल्यानं आधीच वाद सुरू झालाय. त्यात आता भर पडलीय ती नव्या आक्षेपाची. नव्या संसद इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते पार पडणार आहे. मात्र राष्ट्रपती या संसदेच्या पदसिद्ध प्रमुख असल्यानं द्रौपदी मुर्मू Droupadi Murmu, President of India)
यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवं, अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) घेतलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना ठाकरे गटानं (Shivsena Thackeray Group) तर सोहळ्यावर बहिष्कार (Boycott) टाकण्याचा इशाराच दिलाय. नव्या संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यास ठाकरेंची शिवसेनाही बहिष्कार घालेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तर उद्घाटन सोहळ्यावरून वाद पेटवणा-या विरोधकांवर भाजपनं निशाणा साधलाय. नव्या संसद भवनाची उभारणी ही मोदी सरकारच्या काळातील ऐतिहासिक कामगिरी मानली जातेय...


कसं असेल नवं संसद भवन? 
नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल 1200 कोटी रुपये खर्च झालेत. सध्याच्या संसदेत 550 लोकसभा आणि 250 राज्यसभा खासदारांसाठी आसनव्यवस्था आहे. मात्र नव्या संसद भवनात 888 लोकसभा आणि 384 राज्यसभा खासदार बसू शकतील. नव्या इमारतीत हायटेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूची पायाभरणी झाली. आता 28 मे 2023 रोजी मोदींच्याच हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणाराय


28 मे रोजी दुपारी बारा वाजता पंतप्रधान मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करतील. यासाठी सकाळपासूनच हवन पूजेला वैदिक विधी  मंत्रोच्चाराने कार्यक्रमाला सुरुवात होईल. लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी नव्या संसद भवानासाठी केंद्र सरकारकडे आग्रह केला होता. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. चार मजल्यांच्या या इमारतीत 1224 खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 


जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आणि याच लोकशाहीचं जतन करणारी संसदेची ही नवी वास्तू  त्यामुळं या वास्तूच्या उद्घाटनावरून सुरू झालेला हा राजकीय वाद लवकरात लवकर मिटायला हवा.