नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत पुढील दिवसांत १३ ते १७ तारखेपर्यंत सम आणि विषम नंबरच्या गाड्या लावण्याचा फॉर्म्युला लागू करण्यात आलाय. दिल्लीत सध्या प्रचंड प्रदूषणाची समस्या आहे. त्यामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेय. तसेच प्रदुषणावर उपाय म्हणून कृत्रिम पाऊस पाडण्याचे आदेश देण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदूषणग्रस्त दिल्लीकरांची स्थिती बघता राष्ट्रीय हरित लवादानं सरकारला फटकारले आहे. आरोप प्रत्यारोप आणि पत्रव्यवहारांमुळे दिल्लीचं गॅस चेंबर बनल्याचं लवादानं म्हटले आहे. शिवाय  गरजअसेल, दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिलेत. 


गेल्या तीन दिवसांपासून सकाळच्या वेळात दिल्लीत अघोषित संचार बंदी लागू झालीय. रविवारपर्यंत प्राथमिक शाळांना सुटी देण्यात आलीय. प्रदूषणाचा स्तर पहाटेच्या वेळी 500 PPM पर्यंत पोहचलाय. त्यामुळे स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.


याची स्वतःहून दखल घेऊन आज हे आदेश दिलेत. दरम्यान आज लवादानं फटकारल्यावर सरकारनं ताताडीने राज्य सरकारनं ऑ़ड इव्हन फॉर्म्युला लागू केलाय. येत्या १३ ते १७ तारखेपर्यंत रस्त्यावर सम आणि विषम नंबरच्या गाड्या आलटूपालटून रस्त्यावर आणता येतील. 


असे असणार वेळापत्रक


दुचाकी आणि सीएनजी वाहने यांना ऑड इव्हन नियमात सूट 
सकाळी ८ ते रात्री ८ वाजता ऑड इव्हन फॉर्म्युला लागू असणार
१३, १५, १७ ऑड नंबरच्याच गाड्या रस्त्यावर धावणार
१४ आणि १६ नोव्हेंबरला सम नंबरच्या गाड्या धावतील
उद्या दुपारी २ वाजल्यापासून दिल्लीतील २२ सीएनजी पंपावर कारसाठी स्टीकर्स मिळणार