Extract Pomegranate Seeds Use This Trick: रोजच्या सवयींमुळे आपण एखादं काम करण्यात पटाईत होतो. काही सेकंदात आपण काम मार्गी लावतो. मात्र काही काम करणं किचकट वाटतं. डाळिंब सोलणं हा एक टास्क असतो. काही जणांना डाळिंबाचे दाणे (Pomegranate) काढणं म्हणजे कंटाळाच असतो. कसं बसं डाळिंब सोलून दाणे काढण्याचा प्रयत्न असतो. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही काही सेकंदातच डाळिंबाचे दाणे काढू शकाल. एका व्यक्तीने 13 सेकंदात संपूर्ण डाळिंब सोललं. त्याचा वेग पाहून नेटकरीही आश्चर्यचकीत झाले आहेत. आतापर्यंत 32 लाखाहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. 


असा पद्धतीने डाळिंबाचे दाणे काढा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डाळींब आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं फळ आहे. व्हायरल व्हिडीओत पाहून शकता एक व्यक्ती झाडावर लागलेलं डाळिंब तोडतो. त्यानंतर वरच्या बाजूला चाकूने षटकोनी काप देतो. त्यानंतर वरचा भाग खेचून बाजूला काढतो. तसेच पांढरा पापुद्रा असलेल्या ठिकाणी काप देतो आणि संपूर्ण डाळिंब खोलतो. त्याचे सात भाग होतात, त्यामुळे दाणे काढणं सहज सोपं होतं. 



Sankrit Language: कॅब ड्रायव्हरचा संस्कृतमध्ये संवाद, भाषेवरील प्रभुत्व पाहून तुम्हीही व्हाल आवाक्


डाळिंब खाण्याचे फायदे


डाळिंबाच्या दाणे किंवा ज्यूसमुळे हृदय निरोगी राहतं. त्याचबरोबर त्वचा तजेलदार राहते. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, गरोदर महिलांसाठी डाळिंबाचा ज्यूस आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो. यात मिनरल्स, विटामिन आणि फ्लोरिक अॅसिड असतं. गर्भातील बाळासाठी फायदेशीर ठरतं. त्याबरोबर फायबर, विटामिन के, सी, बी, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड अशी पोषक तत्व असतात.