पूजा खेडकरची आता खैर नाही! दिल्ली पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
Pooja Khedkar Disability Certificate: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चाललाय.
Pooja Khedkar Disability Certificate: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात चाललाय. पूजा खेडकर प्रकरणात अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहेय दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडून पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात नेमकं काय आहे? याबद्दल सविस्त जाणून घेऊया.
दिव्यांग प्रमाणपत्र खोटे
पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचे दिल्ली पोलीसांच्या अहवालात म्हटले आहे. सिव्हील परीक्षा 2022 - 2023 दरम्यान पूजा खेडकरने सादर केलेले प्रमाणपत्र खोटे असल्याचे म्हटले आहे. तसेच पूजा खेडकरने आपल्या प्रमाणपत्रातील नावामध्ये बदल केल्याचे अहवालात म्हटले आहे. पूजा खेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे हे प्रमाणपत्र महाराष्ट्राने दिलेले नाही.दिल्ली क्राइम ब्रांचने दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली आहे.
2 वेगळी दिव्यांग प्रमाणपत्र
युपीएससीने दिलेल्या कागदापत्रानुसार पूजा खेडकर यांची 2 दिव्यांग प्रमाणपत्र दिल्ली क्राइम ब्रांचने दिली होती. या कागदपत्रांचा तपास केला असता दोन दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने दिली आहेत.
पहिल्या दिव्यांग प्रमाणपत्रात काय?
18 जानेवारी 2021 ला हे प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. यातील पहिल्या प्रमाणपत्रात पूजा खेडकरची 40 टक्के दृश्यमानता कमी असून 20 टक्के मेंदूचे आजार म्हणजेच मानिसक आजार असल्याचे म्हटले आहे. हे पहिलं प्रमाणपत्र पूजा खेडकरने 2022 मध्ये सादर केलं होतं.
दुसऱ्या दिव्यांग प्रमाणपत्रात काय?
पूजा खेडकरच्या दुसऱ्या दिव्यांग प्रमाणपत्रानुसार तिच्या उजव्या कानात 10 टक्के ऐकण्याची क्षमता, दृश्यमानता 40 टक्के कमी असल्याचं सांगण्यात आले आहे. यासोबत आपल्याला सांध्याचा आजार असल्याचं प्रमाणपत्रावेळी सांगण्यात आलं आहे. दुसरं प्रमाणपत्र 2023 ला सादर केलं होतं.
दुसरं प्रमाणपत्र बनावट?
या सगळ्या प्रमाणपत्राची पडताळणी केली असता दुसरं प्रमाणपत्र हे अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल ने दिलंच नव्हतं असं समोर आलं आहे. त्यामुळे पूजा खेडकरने सादर केलेले दुसरे प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय.