पणजी : पूनम पांडे ही मॉडेल आपल्या फोटो आणि व्हीडिओंमुळे सतत वादात असते, पूनम पांडे हिने काही दिवसांपूर्वी गोव्यात चापोली धरणावर हॉट व्हीडिओ शूट केला आहे, असं म्हटलं जात आहे. हा व्हीडिओ पॉर्नसारख्या प्रकारात मोडणारा आहे. हा व्हीडिओ गोव्यात प्रचंड व्हायरल होत आहे. लॉकडाऊन काळात गोवा सरकारच्या पाटबंधारे विभागाने हा व्हीडिओ शूट करण्यासाठी कशी परवानगी दिली, असा सवाल आता सरकारला विचारला जात आहे. सर्वसामान्यांना बंदी असताना मॉडेल तिथे कसे पोहोचले, परवानगी कशी मिळाली असा प्रश्न आता विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे शुटिंगसाठी परवानगी देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत असल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाकडून केली जात आहे.


या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून होत असताना, पूनम पांडे हिच्या पहिल्या तक्रारीची चौकशी सुरू असताना आता हे नवीन प्रकरण समोर आल्याने सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे.


पूनम पांडे दीड महिन्यापूर्वी आपला पती सॅम बॉम्बेसोबत हनीमूनला गोव्यात आली होती. तेव्हा सॅमने आपल्याला मारहाण केली आणि विनयभंग केला अशी तक्रार पूनमने पोलिसात दिली होती. आता या प्रकरणाचा तपास सुरू असताना हे नवीन प्रकरण समोर आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.