Jio नेटवर्कवर पॉर्न साईट बंद, इतर कंपन्याही घालणार बंदी?
जिओने केली सगळ्यात आधी अंमलबजावणी
मुंबई : जिओ नेटवर्कमध्ये पॉर्न वेबसाइटवर बंदी घालण्यात आली आहे. टेलीकॉम डिपार्टमेंटने ऑपरेटर्सला पॉर्न साईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. याची सगळ्यात आधी अमंलबजावणी सगळ्यात आधी जिओ नेटवर्कने केली आहे.
जिओने याची अधिकृत घोषणा अजून केलेली आहे. पण लोकांकडून अशी माहिती मिळते आहे की, जिओच्या नेटवर्कवर पॉर्न साईट ब्लॉक झाल्या आहेत. सोशल मीडियावर देखील याची चर्चा आहे.
इतर कंपन्याही करणार बंद?
इतर ऑपरेटर देखील पॉर्न साईटवर बंदी घालणार आहेत. पीटीआयच्या माहितीनुसार डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉमने उत्तराखंड हायकोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी करत सगळ्या इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्स नेटवर्कला पॉर्न साईट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. टेलीकॉम डिपार्टमेंटने जवळपास 850 वेबसाईट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तराखंड हायकोर्टाने 28 सप्टेंबरला आदेश दिले होते की, जर टेलीकॉम ऑपरेटर कंपन्यांनी पॉर्न साईट बॅन नाही केले तर त्यांचं लायसन्स रद्द केलं जाईल. सर्व इंटरनेट सर्विस कंपन्यांना आदेश देण्यात आले आहे की त्यांनी सर्व पॉर्न साईट ब्लॉक कराव्या. जिओने अशा साईट बंद केल्या आहेत. भारतात पॉर्न बनवण्यावर कायदेशीर बंदी आहे पण ऐकट्यात पाहण्यावर कोणतीही बंदी नाही.