नवी दिल्ली : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी काँग्रेसने सुरु केली आहे. सोनिया गांधी यांनी आज आयोजित केलेल्या 'डिनर'ला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध २० पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यानी ट्विट करत एक चांगली राजकीय चर्चा झाली आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या डिनरमधून सर्वोत्तम डिनर पार्टी आयोजित केली. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकमेकांना भेटण्याची संधी मिळाली. या नेत्यांमधील जवळीकता वाढीला लागली आहे. या काळात भरपूर राजकीय चर्चा झाली होती परंतु सकारात्मक उर्जा, प्रेमळपणा आणि खऱ्या मैत्रीची आणि स्नेह पाहायला मिळाले, असे  राहुल गांधी यांनी ट्विट केले.



 
गुजरात, हिमाचल प्रदेश आणि नंतर ईशान्येतील राज्यांत भाजपने चांगले यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी-अमित शाह यांना शह देण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजची डिनर पार्टी होती.



सोनियांनी बोलावलेल्या डिनरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तारीक अन्वर, बसपा नेते सतीश चंद्र, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंह, राजदचे तेजप्रताप यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी, शरद यादव, आययूएमएलचे पी. के. कुन्हालीकुट्टी, एआययूडीएफचे बद्रुद्दीन अजमल, केरळ काँग्रेसचे जोस के. मणी, जनता दलाचे (सेक्युलर) डी. कुपेंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.